Sambhaji Nagar News : अडीच हजार शेतकऱ्यांना मिळतेय दिवसा वीज!

विहामांडव्यात १४ गावांसाठी सोलार ग्रीड प्रकल्प यशस्वी, वातावरणालाही पूरक, तयार होत नाही धोकादायक वायू
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News sakal

छत्रपती संभाजीनगर : दिवसा वीज मिळत नाही, म्हणून शेतकरीवर्ग आधीच त्रस्त आहे. यावर पर्याय काढण्याचे प्रयत्न होत आहेत. असाच एक यशस्वी प्रयोग विहामांडवा (ता. पैठण) येथे राबविण्यात आला आहे. तब्बल आठ एकरावर दोन मेगावॅट क्षमतेचे सोलार पॅनल (सौरऊर्जा) बसविण्यात आले असून, या माध्यमातून परिसरातील तब्बल १४ गावांमधील दोन हजार ५०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

यासंदर्भात ‘आदित्य ग्रीन एनर्जी’चे संचालक आदिनाथ सांगवे यांनी सांगितले, की दोन मेगावॅटच्या या सोलार पॅनलद्वारे वर्षाकाठी ३२ ते ३४ लाख युनिट वीजनिर्मितीची क्षमता आहे. हे सोलार पॅनल विहामांडवा येथील अजित सिसोदिया यांच्या शेतात बसविण्यात आले आहे. परिसरातील महावितरणच्या सबस्टेशनला इथून ठराविक शुल्कापोटी वीज पुरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोलारमध्ये तयार झालेली वीज ही जवळच्या महावितरणच्या सबस्टेशनला देण्यात येते, तिथून ती वीज शेतकऱ्यांना महावितरणच्याच दरात दिली जाते. यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास मदत झाली आहे.

कुठे सुरू करता येते सोलार पॅनल?

सांगवे यांनी सांगितले, की ज्या शेतात काहीच पिकत नाही, त्या ठिकाणी हा सोलार प्रकल्प करता येतो. दोन मेगावॅट क्षमतेसाठी सात कोटी रुपये खर्च झाला आहे, तो पाच ते सहा वर्षांत परतावा होतो. सोलार पॅनल बसविण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्यही मिळते. विशेष म्हणजे यातून ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा प्रकल्प बसविला जातो, त्या शेतकऱ्याला प्रतिवर्षी प्रतिएकरी ५० हजार रुपयांचा मावेजा देण्यात येतो. २५ वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना करार करता येत असल्याचेही सांगवे म्हणाले. आजवर सोलार पॅनलची स्वच्छता करण्यासाठी आठवड्यातून एकदा दहा हजार लीटरवर पाणी, चार ते पाच जणांचा मजुरी खर्च होत असे. परंतु, रोबोटद्वारे पॅनल स्वच्छ करता येत असल्याने या खर्चात बचत झाली आहे.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Corporation : नवी प्रभाग रचना ठरणार डोकेदुखी ; अपक्षांना फटका, मोठ्या पक्षांचा हाेईल फायदा

विहामांडवा परिसरात सात हजार ५९२ सोलार पॅनल बसविलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळण्यास मदत होत आहे.

— आदिनाथ सांगवे,

संचालक, आदित्य सोलार एनर्जी.

गाव परिसरातील ३३ केव्हीच्या रोहित्राला १४ गावे जोडलेली आहेत. या गावच्या शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा आणि आठ दिवस रात्री वीज मिळत होती. आता सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी वीज या सोलारद्वारे मिळत आहे. दोन रोबोटद्वारे एका दिवसात सात हजार ५०० पॅनल स्वच्छ केले जातात. एक रोबोट अडीच लाख रुपयांना आहे.

— अजित सिसोदिया, शेतकरी, विहामांडवा

आमच्या परिसरातील सबस्टेशन ओव्हरलोडमध्ये चालत होते. आता पिकांना वेळेत पाणी मिळतेय, त्यामुळे आमच्याही वेळेत बचत झाली असून, उत्पादनही चांगले मिळण्यास मदत झाली आहे.

— अशोक राक्षे, शेतकरी, विहामांडवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com