
छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ७३५ कोटींचे नियतव्यय मंजूर झाले. मात्र, आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन महिने झाले तरी यापैकी अद्याप एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही. याशिवाय अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठीच्या ११४.४६ कोटीपैकी फक्त ३.१४ कोटी निधी प्राप्त झाला.