हॅलो! तुमची तब्येत कशी आहे?

Doctor
Doctor
Summary

कोरोना संसर्गानंतर म्युकरमायकोसिसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या नागरिकांना योग्य ती काळजी घेतली नसल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे प्रकार समोर येत आहेत.

औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) असलेल्या काही नागरिकांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच कोरोनानंतर नागरिकांनी आरोग्याबाबत सतर्क राहावे, यासाठी महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) कॉल सेटर सुरू केले आहे. या कॉल सेंटरमधून दोन दिवसात अडीच हजार नागरिकांशी संवाद साधण्यात आला. कोरोना (Corona) संसर्गानंतर म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या नागरिकांना योग्य ती काळजी घेतली नसल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका व मुंबई येथील ओरेन्ट कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने अशा नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कॉलसेंटमधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसोबतच हायरिस्क व कोमॉर्बिडिटी असलेले नागरिक, साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड व कोविडपश्चात रुग्ण, कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठीचे पात्र लाभार्थी यांना संपर्क साधला जात आहे. सकाळी नऊ ते सांयकाळी सात वाजेपर्यंत प्रकृतीची चौकशी केली जात आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरमधून दोन दिवसात ६४० होम आयसोलेशन, १७५० पोस्ट कोविड नागरिकांशी संवाद साधण्यात आला. (Two Thousand CItizens Contacted Call Centre For Health Regarding Issue)

Doctor
Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाचे नवे १०५६ रुग्ण

अनेकांनी थकव्याची व्यक्त केली चिंता

रुग्णांना काही त्रास आहे का?, औषधी वेळेवर घेता का? पल्सरेट ऑक्स्मिटरव्दारे (Oximeter) तपासले जातात का? याबद्दल विचारणा करण्यात आली. पोस्ट कोविड रुग्णांनी मात्र थकवा जाणवतो असे सांगताच डॉक्टरांनी जास्त पाणी पित जा, लिंबू शरबत घ्या, तर काही जणांनी नाक वारंवार बंद असल्याची तक्रार करताच त्यांना तातडीने नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचविण्यात आले. डॉ. सचिन हाके आणि डॉ. माधुरी गव्हाणे हे वैद्यकीय सल्ला देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com