Chh. Sambhajinagar : कन्नड व गंगापूरमध्ये दोन तरुणांनी संपवले जीवन; गावांमध्ये शोककळा
Mental Health : कन्नड व गंगापूर तालुक्यात गुरुवारी दोन युवकांनी गळफास घेऊन जीवन संपवले. ग्रामीण भागातील मानसिक आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कन्नड : तालुक्यातील भोकनगाव येथील १७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.१५) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. भोकनगाव येथील विठ्ठल दत्तू जाधव १० वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.