esakal | रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दोघांचा बळी, सिल्लोड जवळील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय बेलवार व कार्तिक लोणकर

रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दोघांचा बळी, सिल्लोड जवळील घटना

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये सोमवारी (ता.13) रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सिल्लोड-औरंगाबाद (Aurangabad) रस्त्यावर सिल्लोड (Sillod) शहरातून बाहेर पडल्यानंतर हाकेच्या अंतरावर रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सोमवारी मात्र खड्ड्याने (Accident In Aurangabad) तरूणांचा जीव घेतला. भरीस भर म्हणजे या ठिकाणी खड्ड्यांमध्ये मुरूमाची भरती करण्यात आली होती. पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी चिखल झाला होता.

हेही वाचा: घरी उरलेल्या पालक पनीरपासून बनवा पुलाव, चव आणखीन वाढेल

सोमवारी संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथून दुचाकीवरून (एमएच 20 सीडब्ल्यू 0157) दोघे जण पिंपळगावपेठ (ता.सिल्लोड) येथे जात होते. खड्ड्याच्या ठिकाणी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीवरील कार्तिक संजय लोणकर (वय.19) व धनंजय अशोक बेलवार (वय.21, दोघे रा.पिंपळगाव पेठ, ता.सिल्लोड) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून आतिष ताठे, सोमिनाथ कळम, विश्वनाथ कळम यांनी दोघांना सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी रोहन राऊत यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

loading image
go to top