
...तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील : उद्धव ठाकरे
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर जाहीर सभा सुरू आहे. यावेळी अनेक दिवसांपासून नामांतराच्या मुद्द्यावर उद्दव ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मी आत्ताही या शहराचे नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदलले आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही दुसऱ्या धर्मांचा द्वेश करत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: ...तो आक्रोश मोर्चा सत्तेसाठी होता; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता फडणवीसांना टोला
निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईघाईत औरंगाबाद शहरात मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नसून, व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार असून विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन आहे. ते मी कधीही विसरणार नाही ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या शहराचे जेव्हा नामांतर करेल पण या संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असेल नगर मी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. संभाजीनगर नाव करणार हे वचन बाळासाहेबांनी दिलं आहे ते पूर्ण करणार, विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राने का अडवून ठेवला असा प्रश्नदेखील यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी काश्मीर पंडितांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरी पंडितांची रक्षा करा, नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका, मर्द असाल तर काश्मीरमध्ये जाऊन त्यांची रक्षा करा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला दिला आहे. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही.. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितांचा आपमान करण्याचा संबंध काय? आपल्या देवी-देवतांचा अपमान करायचा नाही तसं त्यांच्याही देवतांचा अपमान करायचा नाही.
Web Title: Uddhav Thackeray Aurangabad Rally Name Chage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..