
eknath shinde
Esakal
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले. भगवे ध्वज, फलक आणि ट्रॅक्टरांच्या मिरवणुकीने रस्ते व्यापले. गुलमंडी चौकात समारोप होत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली.