Udgir Crime Case
esakal
उदगीर : व्यसनाधीन झालेल्या पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना उदगीर (Udgir Crime Case) तालुक्यातील करखेली येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी घडली. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून मुलाने ६५ वर्षीय आईचे केस धरून जमिनीवर डोके आपटले. गंभीर जखमी आईचा जागीच मृत्यू झाला.