उदगीर मतदारसंघात ३३

उदगीर मतदारसंघात ३३
Published on
उदगीरमध्ये ३३ हजार मतदारांची नावे वगळली एसआयआरच्या प्रारूप यादीत २३,७२४ नोंदी विसंगत; २८ सप्टेंबरपासून सुनावणी ----- उदगीर, ता. २१ (बातमीदार) : विशेष पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत उदगीर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान दुबार नोंद, स्थलांतर तसेच पडताळणी न झालेल्या नोंदी आदी कारणांमुळे ३३ हजार ३७९ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. यापैकी २३ हजार ७२४ मतदारांच्या नोंदी २००२च्या मतदार यादीशी विसंगत आढळल्या असून, संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. सुनावणीला २८ सप्टेंबरपासून सुरवात होणार असल्याची माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली. एसआयआर प्रक्रियेपूर्वी उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दोन लाख ९९ हजार ७१६ मतदार होते. पडताळणीनंतर प्रारूप यादीत दोन लाख ६६ हजार ३३७ मतदार राहिले आहेत. त्यामुळे ३३ हजार ३७९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळलेल्या मतदारांपैकी २३ हजार ७२४ नोंदी २००२च्या यादीशी जुळल्या नसल्याने त्यांना सुनावणीची संधी दिली जाणार आहे. ----- हरकतीसाठी करा संपर्क प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलाबाबत हरकत असल्यास संबंधित नागरिकांना बीएलओ किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे विहित नमुन्यात हरकत नोंदविता येणार आहे. नागरिकांनी नागरिकत्व व मतदार नोंदीच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, तपशील दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८, तर मृत्यू किंवा कायमस्वरूपी स्थलांतर झालेल्या मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ मध्ये अर्ज करता येणार आहे. ----- सुनावणीसाठी कोणती कागदपत्रे? सुनावणीच्या वेळी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे किंवा अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र आदी उपलब्ध कागदपत्रे सादर करता येणार आहेत. आधार कार्डही ओळखपत्र किंवा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा हरकत नोंदवावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com