
छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्याला सहा मेपासून अवकाळी पावसाने झोडपले. त्यानंतर या महिन्यातही मॉन्सूनच्या आणि मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मराठवाडा विभागात गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या दोन महिन्यांत तब्बल २७ हजार १०३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.