

Dharashiv News
esakal
धाराशिव: मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत असून गुरुवारीही (ता. १९) धाराशिव, बीड, परभणी, जालना जिल्ह्यांच्या काही भागात सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात दुपारनंतर बहुतांश भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशी तालुक्यात विजोरा परिसरात गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या, काढून ठेवलेल्या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसत आहे.