

छत्रपती संभाजीनगर : परळी वैजनाथ (जि. बीड) येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाचा वापर केला जातो. वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे राखेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. केंद्राच्या परिसरातील अनेक गावांना हा त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.