

Chhatrapati Sambhajinagar
esakal
उस्मानपुरा: स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. कुटुंब आणि शाळांमधून त्यांच्यावर तसे संस्कार होणे अपेक्षित आहे. पण, येथील विभागीय शिक्षण मंडळालाच याचा विसर पडला. मंडळ कार्यालयाच्या आवारात भंगार आणि कचऱ्याचे ढीग साचले. वाहनतळाची जागा तर उकिरडा झाली. त्यामुळे येथील स्वच्छतेची ‘पडताळणी’ कधी होणार आणि शिस्तीची ‘छडी’ कोण उगारणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.