
औरंगाबाद : परिवहन विभागाने (Transport Department) राज्यातील १५५ मोटारवाहन निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यात औरंगाबादचे (Aurangabad) तीन अधिकारी पळवले आणि लातूरला केवळ एक अधिकारी दिला. औरंगाबादच्या जागा रिक्तच ठेवल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादेत अगोदरच रिक्त असलेल्या सतरा जागांमध्ये पुन्हा तीन अधिकाऱ्यांची भर पडली आहे. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे कार्यालय प्रमुख म्हणजे प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Offices) पदही वर्षभरापासून रिक्तच आहे. औरंगाबाद, बीड आणि जालना अशा तीन कार्यालयांत जवळपास तब्बल ९० जागा रिक्त आहेत. परिवहन विभागातर्फे मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जातो. औरंगाबाद विभागात अधिकाऱ्यांची कायमच कमतरता असते. या कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, बीड आणि जालना अशा तीन कार्यालयांचा समावेश आहे. राज्य शासनाने नऊ ऑगस्टरोजी राज्यातील बदल्यांमध्ये औरंगाबादवर पुन्हा अन्याय केला. औरंगाबाद कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक जयश्री झिने यांची ठाणे येथे बदली केली आहे. तर अनामिका बाविस्कर यांची मुंबई पश्चिम आणि रहिमा हमजेखान मुल्ला यांची पुणे येथे बदली केली.
मात्र, यी तीनही जागांवर नवीन अधिकारी देण्यात आले नाहीत. त्यामुळे औरंगाबादच्या रिक्त पदांमध्ये पुन्हा तीन अधिकाऱ्यांची भर पडल्याने मोटार वाहन निरीक्षकांच्या वीस रिक्त जागा झाल्या आहेत. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून महत्त्वाचे कार्यालय प्रमुखाचे हे पद रिक्त आहे. त्यांच्या जागेवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार काम पाहत आहेत. श्री. मैत्रेवार यांना दोन्ही पदांचा भार सांभाळावा लागत आहे. या खालोखाल महत्त्वाचे असलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पाच पदे मंजूर असून औरंगाबाद कार्यालयात तीन तर बीड आणि जालना प्रत्येकी एक अशी पाच पदे आहेत. बीड येथील पदावर नगरच्या अधिकाऱ्याला पदभार दिलेला आहे. तर जालना येथील पदावर विजय काळे कार्यरत आहेत.
औरंगाबाद कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) श्रीकृष्ण नखाते यांची काही दिवसांपूर्वी परभणी येथे बदली झाली, त्यांची जागा अद्यापही रिक्तच आहे. तर दोन आठवड्यांपूर्वी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्याविरोधात लाचेची कारवाई झाल्याने त्यांचा मुख्य पदभार काढावा लागलेला असून ते सध्या अकार्यकारी म्हणून रुजू आहेत. त्यामुळे सध्या रमेशचंद्र खराडे हे एकमेव एआरटीओ कार्यरत असून तीन अधिकाऱ्यांचा पदभार त्यांना एकट्यालाच सांभाळावा लागतो. त्यांच्या मदतीला मोटार वाहन निरीक्षक मेहरकर यांना वाहन परवाना विभागाचा तात्पुरता अधिकार देऊन काहीसा भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्मचाऱ्यांच्याही बदल्या
बदल्यांमध्ये लिपिकवर्गीय सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विक्रम राजपूत आणि श्री. बनकर यांच्या अनुक्रमे बीड आणि जालना येथे बदल्या केल्या आहेत. तर कनिष्ठ लिपिकांमध्ये मिलिंद ससाणे आणि मनीषा वासनिक यांची जालना येथे तर मोहम्मद रहेमान यांची बीडला बदली केली. जालना येथून कृष्णा म्हस्के आणि बीडहून प्रशांत शिंदे यांची औरंगाबादला बदली झाली आहे.
तब्बल ९० पदे रिक्त
प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी संवर्गात आरटीओ एक, एआरटीओ दोन, निरीक्षक वीस, सहायक निरीक्षक ३६, वाहन तपासणीस तीन तर कर्मचारी संवर्गात सध्या अधीक्षक, मुख्य लिपीक एक, वरिष्ठ लिपिक सहा, कनिष्ठ लिपिक सहा, वाहन चालक दोन, शिपाई आठ आणि परिवहन हवालदार पाच अशी तब्बल ९० पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामकाजाला कायमच विलंब होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.