Chhatrapati Sambhajinagar: मिरची, अद्रक, लसणाला भाववाढीची फोडणी; लिंबू ५० रुपयांनी स्वस्त; टोमॅटो, बटाटे, कोबी, काकडीचे दर स्थिर.

Rise in Chilli, Ginger and Garlic Prices: छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार; मिरची, अद्रक, लसूण महागले तर लिंबाचे दर कमी झाले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात दरवाढ आणि स्थिर दरामुळे ग्राहकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: वाढत्या उन्हाबरोबरच भाजीपाला बाजारात मिरची, अद्रक व लसणाला भाववाढीची फोडणी मिळाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मिरची व अद्रकच्या भावात २० रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो १०० रुपयांवर पोचले. लसूण १५० रुपये किलोवर पोचला आहे. लिंबाचे भाव २०० रुपये किलोवर पोचले होते. त्यात आता ५० रुपयांची घसरण झाली. सध्या १५० रुपये किलोने लिंबू मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com