Examination Department : डॉ. विजय फुलारी यांनी गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अचानक दौरा केला. अनुपस्थित असलेल्या कर्मचार्यांची नोंद घेत, कर्तव्याची आठवण करून दिली.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचे वाहन गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाला थेट राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनाच्या पोर्चमध्ये पोचले. कुलगुरू उतरून थेट आत गेले.