esakal | गंगापूर : पर्जन्य अहवाल चुकीचा दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण
sakal

बोलून बातमी शोधा

धामोरीचे उपसरपंच रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१२) सकाळपासून डोणगाव (ता.गंगापूर) ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरु केले आहे.

गंगापूर : पर्जन्य अहवाल चुकीचा दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण

sakal_logo
By
अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) - गंगापूरचे (Gangapur) तहसीलदारांनी नुकत्याच ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात डोणगाव मंडळातील गावांचा समावेश नसल्याचे निदर्शनास आले आहे. डोणगाव मंडळाचे पर्जन्यमान ज्या यंत्राच्या साहाय्याने तपासले त्या यंत्राची दशा पाहता यांनी पर्जन्यमापन कसे नोंद केले. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे सांगत मंडळातील धामोरीचे (Aurangabad) उपसरपंच रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१२) सकाळपासून डोणगाव (ता.गंगापूर) ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरु केले आहे. शासनाच्या तसेच अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे डोणगाव मंडळातील शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. या मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) होऊनही शासकीय अधिकाऱ्यांच्या क्षुल्लक चुकीमुळे मंडळातील शेतकरी बांधव अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही.

हेही वाचा: कंपनीच्या विरोधात गेल्याने एकास पाजले विष, मालकावर गुन्हा दाखल

तसेच डोणगाव मंडळातील गावे समाविष्ट होत नाही. तोपर्यंत शेतकाऱ्यांसमावेत यांच्या साथीने या ठिकाणीच उपोषणाला बसलो आहे, असे रविंद चव्हाण यांनी सांगितले. पर्जन्यमापक यंत्र चक्क पाण्यात बुडालेले असतांनाची परिस्थिती असूनही या मंडळातील पर्जन्यमान कमी कसे नोंदवले गेले असा सवालही श्री.चव्हाण यांनी उपस्थित केला. उपोषणाला प्रारंभ करताच काही क्षणात पाऊस सुरू झाला. भरपावसात भिजत असलेले चव्हाण व शेतकऱ्यांनी उपोषणस्थळ सोडले नाही. उपोषणास बसलेले शेतकरी हलण्यास तयार नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे.

loading image
go to top