esakal | कंपनीच्या विरोधात गेल्याने एकास पाजले विष, मालकावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र

कंपनीच्या विरोधात गेल्याने एकास पाजले विष, मालकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी (जि.बीड) - तालुक्यातील (Ashti) अंभोरा परिसरातील एका कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात आवाज उठविणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याला कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.तीन) विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.११) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा परिसरात कॅनफॅक्स कंपनी असून या कंपनीत परिसरातील अनेक कर्मचारी काम करतात. या कंपनीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध कारणावरून वाद होत (Beed) असायचे. संतोष गजानन आमले (रा.अंभोरा, ता.आष्टी) हा या कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता. संतोष आमले हा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून मिळावे यासाठी कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून ही मिळाले.

हेही वाचा: हे तू काळी आहे, असे हिणवत असल्याने विवाहितेने घेतला गळफास

परंतु याचा राग कंपनीचे मालक सुभाष मुथा यांनी मनात धरून कंपनीतील अधिकाऱ्यांमार्फत संतोषवर खोटा आरोप करून त्याला कामावरून काढून टाकले. शुक्रवारी (ता.तीन) संतोष आमले हा कंपनीच्या समोरील स्वतःच्या शेतात काम करत असताना कंपनीचे अधिकारी संदीप धोंडीबा सुरवसे, विकास विठ्ठल होले व बापुसाहेब सिताराम गायकवाड हे तिघे त्या ठिकाणी येऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवतोस का ? असे म्हणत त्यांनी सोबत आणलेले विष संतोषला पाजले. यावेळी संतोषने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला असता आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करत असलेले नातेवाईक संतोषच्या मदतीला धावत येऊन संतोषला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शनिवारी (ता.११) संतोष गजानन आमले यांने दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष मुथा, संदीप सुरवसे, विकास होले व बापूसाहेब गायकवाड या व्यक्तीवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवी देशमाने हे करित आहेत.

loading image
go to top