vidyasagar patangankar
sakal
आपल्या मराठी संस्कृतीत ग्रंथ-ग्रंथकारांची थोर अशी परंपरा आहे. माउलींनी पसायदानामध्ये ‘आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें’ म्हणून पाठराखण केली आहेच. लेखन-वाचन ही प्राचीन परंपरा पुन्हा वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. ‘दिसामाजि काही तरि तें लिहावे । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ ही समर्थांची उक्ती याचाच उद्घोष करते. ही थोर परंपरा पुढे नेण्यासह चांगली अभिरुची संपन्न पिढी निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. विद्यासागर पाटंगणकर, संत साहित्याचे अभ्यासक, बीड