ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळ वाचले

ब्राह्मणगाव (ता.पैठण, जि. औरंगाबाद) : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळाला वाचवले आहे.
ब्राह्मणगाव (ता.पैठण, जि. औरंगाबाद) : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळाला वाचवले आहे.Paithan Flood Aurangabad

आडुळ (जि.औरंगाबाद) : बाळावर दवाखान्यात उपचार केल्यानंतर परत घरी येत असताना गावात जाण्यासाठी असलेल्या नदीतील रस्त्याला अचानक पुर आल्याने अडकलेल्या मायलेकाला गावातील नागरिकांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने रस्तापार करुन सुखरुप गावात सोडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी (ता.१) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास (Rain) ब्राह्मणगाव तांडा (ता.पैठण) (Paithan) येथे घडली. या घटनेत प्राण वाचलेल्या महिलेचे नाव वर्षा समाधन चव्हाण असे आहे. ब्राह्मणगाव तांडा येथील वर्षा चव्हाण यांची 13 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय दवाखान्यात प्रसुती झाली होती. तेव्हा ही या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी तांड्यात रुग्णवाहिका आली नव्हती.

ब्राह्मणगाव (ता.पैठण, जि. औरंगाबाद) : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळाला वाचवले आहे.
औरंगाबाद शहराला मुसळधार पावसाने झोडपले; सुखना, खाम नदीला पूर

त्यामुळे सदरील महिलेला प्रसुती कळा येत असताना लोडिंग रिक्षामध्ये टाकून तिन किलोमीटर लांब ब्राम्हणगाव पर्यंत आणावे लागले होते त्यानंतर ब्राह्मणगाव येथपर्यंत आलेल्या रुग्णवाहिकेत टाकुन औरंगाबाद येथे नेले होते. प्रसुती कळा येत असतांना लोडिंग रिक्षात बसविल्याने तिचे सिझर करावे लागले होते. त्याच महिलेच्या बाळाला न्युमोनिया झाल्याने तिला व बाळाला घेऊन काल तिची बहीण लताबाई बाबासाहेब जाधव व भाऊ ज्योतीराम देवीदास राठोड यांनी तिला औरंगाबाद येथील दवाखान्यात नेले होते. दवाखान्यातून परत ब्राह्मणगाव तांडा येथे येत असतांना गावात जाण्यासाठी असलेल्या नदीतील रस्त्याला पुर आला व ते त्या पुरात अडकले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी दोन्ही बाजूंनी उभे राहुन दोरी बांधली व दोन्ही मायलेकांना मदत करुन दोन्हींना सुखरुप बाहेर काढले.

ब्राह्मणगाव (ता.पैठण, जि. औरंगाबाद) : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळाला वाचवले आहे.
अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणाचे पुन्हा दरवाजे उघडले,पाणीपातळीत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com