esakal | ग्रामीण भागात आताही कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत गैरसमजच
sakal

बोलून बातमी शोधा

कोविशिल्ड लस

आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रद्धेमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या भागातील लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागात आताही कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत गैरसमजच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गंगापूर (जि.औरंगाबाद) : ग्रामीण (Aurangabad) भागात जनजागृतीअभावी लस घेण्यास नागरिक पुढे येत नसल्याने (Gangapur) शहरी भागातील नागरिक आता ग्रामीण भागाकडे धाव घेऊन लस घेत आहेत. अनेक गाव खेड्यातून नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबद्दल (Corona Vaccination) अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरण मोहिम (Corona) राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत (Gram Panchayat) प्रशासनाने स्वीकारावी, अशी मागणी केली जात आहे. तालुक्यात अशी अनेक गावे आहेत. (Villagers Still Not Take Corona Vaccine In Gangapur)

हेही वाचा: रात्रभर २० गावांचा वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांमधून संताप

त्यामध्ये अशिक्षित कुटुंबाची संख्या जास्त आहे. अशा गावांमध्ये आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रद्धेमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या भागातील लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते. मृत्यू होतो. नपुंसकता येते, महिलांना गर्भधारणा होत नाही असे गैरसमज कुटुंबातील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने स्वीकारून प्रत्येक गावातील लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे. शासन काही कालावधी निश्चित करून त्या कालावधीत शंभर टक्के कोरोना लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.