
छत्रपती संभाजीनगर : येथील एका हॉटेलसमोर तीन जणांवर कोयत्याने वार केल्यानंतर यातील एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शुक्रवारी (ता. २०) महापालिका, पोलिसांनी रस्त्यावर येत मुकुंदवाडी परिसरातील हॉटेल, टपऱ्या, चिकन-मटणाची दुकाने अशा २९९ अतिक्रमणांचा चुराडा केला.