छत्रपती संभाजीनगर : एकीकडे पोलिस जुगार अड्डे, अवैध गुत्त्यांवर छापे टाकत आहेत. तर, दुसरीकडे दारू अड्डावरही पत्त्याचे डाव रंगत असल्याचे समोर आले आहे. पत्त्याच्या खेळात अकरा हजार रुपये जिंकल्याच्या कारणावरून दारू अड्ड्यावर पाच जणांनी मिळून एका तरुणावर लाकडी दांड्याने हल्ला करत जबर मारहाण केली. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १८ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास गौतमनगरात घडली.