

Chhatrapati Sambhajinagar
esakal
वाळूज: ‘काका, मलाही येऊ द्या ना’ म्हणत ओळखीतील एका तरुणाच्या मागे तीनवर्षीय मुलगा लागला. दारूच्या नशेत असलेल्या संबंधित तरुणाने कुणाला काहीही न सांगता त्या चिमुकल्याला दुचाकीवर बसवले. सोबत त्या तरुणाचा आठवर्षीय भाचाही होता. मागे लागलेला मुलगा कुठे दिसत नसल्याने कुटुंबीय घाबरले. त्यांनी पोलिस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दिली.