

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: नवीन जल योजनेतील २,५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. कौडगावजवळील स्क्रोल व्हॉल्व्हचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (ता. चार) सायंकाळपर्यंत पाण्याने १९.८४ किमीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर रविवारी (ता. पाच) सायंकाळपर्यंत विनाअडथळा हे पाणी फारोळ्यात पोचले. रविवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनीतील पाण्याने २८ किमीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.