Chhatrapati Sambhajinagar: १०० ट्रान्सफॉर्मर, ४०० टन कचरा आगीत खाक; वाळूज औद्योगिक वसाहतीत दोन ठिकाणी भीषण आग, कंपन्यांचे लाखोंचे नुकसान
Waluj Industrial Estate Hit by Two Fierce Fires: वाळूज औद्योगिक वसाहतीत रविवारी दोन ठिकाणी भीषण आग लागली. महिंद्रा कचरा केंद्रात ४०० टन कचरा, पॉली कॅप कंपनीच्या गोदामात १०० ट्रान्सफॉर्मर जळून खाक.
बजाजनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीत रविवारी (ता. तीन) दोन ठिकाणी भीषण आग लागली. पहाटे महिंद्रा कचरा संकलन केंद्र आगीच्या विळख्यात सापडले. यात तब्बल ४०० टनांहून अधिक कचरा खाक झाला.