पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा! चक्क पुरुषांनी केली पूजा

पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचे झुकते माप असल्याने कायद्याचा गैरवापर करत अनेक महिला पुरुषांवर अन्याय करीत आहे
Aurangabad
AurangabadAurangabad
Updated on

वाळूज (औरंगाबाद): कायद्याचा गैरवापर करून अनेक महिला पुरुषांवर अन्याय करतात. कायदे महिलांच्या बाजूने असल्याने पोलिसांत तक्रार करूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात पत्नीपीडित पुरुषांच्या आश्रमात बुधवारी (ता.२३) पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली.

याविषयी पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनी सांगितले, की उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे व आमच्या बायका उद्या वटवृक्षाची पूजा करतील आणि सात जन्म आम्हाला हाच पती मिळावा, असे साकडे घालतील. त्यामुळे आम्ही वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर यमराजाला व मुंजाला साकडे घातले आहे की, हे यमराजा आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की, अशा बायकांबरोबर सात जन्म काय, सात सेकंददेखील संसार करू शकत नाही! आमच्या बायकांनी आमच्या कुटुंबाचा छळ करून असह्य वेदना दिल्या आहेत. म्हणून उद्या त्यांचे काहीएक म्हणणे ऐकू नकोस व आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा (अविवाहित) ठेव!

Aurangabad
'मुस्लिमांशिवाय तिसरी आघाडी निष्प्रभ ठरेल'

पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचे झुकते माप असल्याने कायद्याचा गैरवापर करत अनेक महिला पुरुषांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे पुरुषांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, अशी आमची मागणी असून आम्ही शासनास वारंवार निवेदन दिले; परंतु त्याचा काही एक फायदा न झाल्याने आम्ही मुंजाला साकडे घालण्यास सुरवात करून बुधवारी पत्नीपीडित पुरुष आश्रम येथे पाचवी पिंपळ पौर्णिमा साजरी केली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारे, ॲड. दासोपंत दहिफळे, चरणसिंग घुसिंगे, वैभव घोळवे, भिकन चंदन, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com