Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा
Online Scam: वाळूज एमआयडीसीतील उद्योजक भगवानदास आहुजा यांची ५३ लाख ८१ हजार रुपये ऑनलाइन फसवणुकीतून गमावली गेली. सायबर भामट्यांनी वॉटर बिल अपडेट अॅपचा नाटक करून त्यांना फसवले.
बजाजनगर : वॉटर बिलसाठी आजच ॲप डाउनलोड करा, अन्यथा कंपनीचे पाणी कायमचे बंद होईल’ अशी बतावणी करून सायबर भामट्याने वाळूज एमआयडीसीतील उद्योजकाची तब्बल ५३ लाख ८१ हजार चार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.