
वाळूज महानगर : गुंगीकारक नशेच्या सिरपची विक्री करणाऱ्या तिघांना विशेष पथकाने अटक करीत ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. साजापूर शिवारात सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपींमध्ये नशेच्या सिरपचा पुरवठा करणारा एक औषध दुकानदारही आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद झाला.