

Wardha News
esakal
वर्धा: एप्रिल महिन्याच्या मध्यापासून आगीच्या झळा सोसणाऱ्या वर्धा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि तुरळक पाऊस झाला. कडक उन्हाच्या लाटेनंतर आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषत: सोमवारी (ता. चार) जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.