बजाजनगर : वाळूज एमआयडीसीसह नागरी वसाहतीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे जणू वाळूजची उद्योगनगरी ही ओळख कचऱ्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे.वाढत्या कचरा समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरने (मसिआ) सिडको आणि एमआयडीसी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला..निवेदनाचा आशय असा ‘वाळूज औद्योगिक परिसर आणि सिडको महानगर क्षेत्रातील मुख्य रस्ते, चौक आणि मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वाळूज एमआयडीसी ही देशात ‘ऑटोहब’ म्हणून ओळखली जाते. येथे सध्या १६२ मोठे, २५० मध्यम आणि १ हजार ८१६ लघुउद्योग कार्यरत आहेत..गट क्रमांकांमध्ये आणखी ८०० उद्योग सुरू असून, यामधून ७० देशांमध्ये उत्पादने निर्यात केली जातात. याठिकाणी दोन ते तीन लाख कामगार कार्यरत आहेत. मात्र, परिसरात सर्वत्र अस्वच्छता असल्याने देश-विदेशातून येणाऱ्या उद्योजकांवर नकारात्मक प्रभाव पडत आहे.’ निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष राहुल मोगले, सचिव दिलीप चौधरी, सहसचिव रमाकांत पुलकुंडवार, सर्जेराव साळुंके, मनीष अग्रवाल, सचिन गायके, वीरेन पाटील, राजेश विधाटे, राजेंद्र चौधरी, संदीप जोशी, कमलाकर पाटील, शरद चोपडे यांच्या सह्या आहेत..Chh. Sambhaji Nagar News : सिडको एन-१ परिसरातील जलवाहिन्यांच्या खोदकामामुळे रस्त्यावर वाढलेली समस्यांची मालिका.उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्षमागील महिन्यात ‘उद्योजकांशी संवाद’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळूजमधील कचरा समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे, असा आरोप मसिआने केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.