chandrashekhar bawankule
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. ९० टक्के काम पूर्ण होण्यासाठी साडेचार महिने लागणार आहेत. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागणार आहे.
राज्यात काही ठिकाणी पाण्याची टाकी उभारून कंत्राटदार पळाल्याचे प्रकार झाले. त्यामुळे सर्वप्रथम मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करायला आम्ही प्राधान्य दिले. एकंदरीत शहरवासीयांना पाणी मिळणार पण वेळ लागणार, असे संकेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत दिले.