chhatrapati sambhajinagar municipal water issue
sakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ यंदाही शहराला २४ तास सात दिवस पाणी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. २००५ पासून म्हणजेच महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीतही शहराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. पाण्यासारखा म्हणजेच तब्बल २,७४० कोटी रुपये खर्च करून नव्या योजनेचे काम हाती घेण्यात आले असले, तरी या योजनेसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.