मरणानंतरही छळ! अंत्यसंस्काराच्या वेळी उपसावे लागते पाणी

मृतदेह कबरमध्ये ठेवून त्यास बंद करेपर्यंत त्यात पुन्हा कमरे इतके पाणी येते. डोळ्यांदेखत मृतदेह पाण्यात भिजू नये म्हणून प्लास्टिक कापडामध्ये गुंडाळून ते कबरीत सोडले जात आहे.
थेरगाव(ता.पैठण) : चौफेर दफनविधीसाठी कबर खोदताना पाणी लागत आहे. | Aurangabad
थेरगाव(ता.पैठण) : चौफेर दफनविधीसाठी कबर खोदताना पाणी लागत आहे. | Aurangabadesakal

पाचोड (जि.औरंगाबाद) : गत महिनाभरापासून अतिवृष्टीने सर्वत्र थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले, विहीरी, तलाव आदी जलसाठे तुडुंब भरले आहेत. जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्याने कुपनलिका, विहीरी पाणी ऊतू लागल्या आहेत, गावांसह शेतशिवारात दीड महिन्यानंतरही अडीच ते तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने खरिपाच्या अपेक्षा ठेवत घाम गाळून अपार कष्ट केलेल्याच्या नशिबी दारिद्रय आले आहे. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसात (Rain) कसेबसे जोपासलेले पिक डोळ्यांदेखत (Aurangabad) नामशेष झाल्याने बळीराजाचे हिरवे स्वप्न पावसासोबत वाहून गेले. जिवंतपणी छळलेल्या पावसाने मरणानंतरही पिच्छा न सोडता छळणे (Paithan) सुरूच ठेवले आहे. याचा प्रत्यय दररोज पाहावयास मिळत आहे. दररोज कुणी वृध्दापकाळाने, कुणी अल्पशा (Last Rites) आजाराने तर कुणी अन्य कारणाने मरण पावत आहे. विशेषतः मुस्लिम, खिश्चन, दलित समाजात मृतदेहाची दफन करण्याची परंपरा आहे.

थेरगाव(ता.पैठण) : चौफेर दफनविधीसाठी कबर खोदताना पाणी लागत आहे. | Aurangabad
निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा

मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी खोदण्यात येणाऱ्या कबरींस फुटावरच पाण्याचे झरे लागत आहे. कबरीचे खोदकाम पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा पाणी उपसावे लागते. मृतदेह कबरमध्ये ठेवून त्यास बंद करेपर्यंत त्यात पुन्हा कमरे इतके पाणी येते. डोळ्यांदेखत मृतदेह पाण्यात भिजू नये म्हणून प्लास्टिक कापडामध्ये गुंडाळून ते कबरीत सोडले जात आहे. क्षणात कबरीत पाणी वाढून मृतदेह पूर्णतः पाण्यात बुडत आहे. एकंदरीत पावसाने जिवंतपणासोबतच मरणानंतरही छळल्याचा प्रत्यय पाचोडसह चौफेर अनुभवयास मिळतो. यंदा पीक बहारात आले असतानाच मुसळधार पाऊस कोसळला अन् पांढऱ्या सोन्यासह पिवळ्या सोन्याची काळी कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी आली. सोन्यासारख्या पिकांचं अक्षरश: मातेरं झालं. अतिवृष्टीमुळे उत्पादन खर्च तर सोडा साधा मशागतीचा खर्चही निघणे कठीण झाले. अतिवृष्टीने 'होत्याचं नव्हतं झालं, शेतकरी पूर्णत: हतबल झाला. कुणी शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी तर कुणी तळमजल्यावरील घरं, दुकानात खालून उकळून वर येत असलेले पाणी विद्युत पंपाचा वापर करून पिके, उद्योगधंदे, संसार वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुतांश शेतकरी पिकांत साचलेल्या पाण्यात विद्युत मोटारी टाकत पाणी बाहेर काढत आहे. काही जण शेतातील बांध फोडून पाणी मार्गस्थ करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र प्रयत्न करूनही तुंबलेले पाणी 'जैसे थे'च आहे. पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर ही सर्वत्र शेतात पाणी साठल्याचे पाहावयास मिळते.

थेरगाव(ता.पैठण) : चौफेर दफनविधीसाठी कबर खोदताना पाणी लागत आहे. | Aurangabad
दहन नव्हे, दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा; कुठे आहेत ही मंदिरं?

शेतातील सर्वच पिके जास्त पाण्यामुळे खराब झाली असुन पाण्यामुळे खराब झालेल्या पिकांची स्थिती पाहता 'बळीराजा' मेटाकुटीस आल्याचे दिसते. त्यांचे सर्वच गणित विस्कटले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. जमीनदोस्त झालेल्या पिकांकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची कुणाचे धाडस होईनासे झाले आहे. अतिवृष्टीने केवळ खरिप काळवंडले नसून त्यांचे जगणे काळवंडून ते होरपळल्यागत झाले आहे. मात्र पावसाने त्यांना एवढ्यावरच छळून मोकळं न करता मरणानंतरही त्यांच्या नशिबी छळणं कायम ठेवलं आहे. डोळ्यांदेखत स्वतःच्या हाताने मृत नातेवाईकाचा दफनविधी करताना मोठया जड अंतकरणाने मृतदेह 'कब्र' (खड्डे) मध्ये (नव्हे)पाण्यात सोडून दफनविधीचे सोपस्कार पार पाडत आहे. हे पाहुन विनोबा भावे यांच्या," ऐ इन्सान दुनिया के बोझ से कहता है मर जाऊ, लेकीन मर के भी चैन न पाया तो कहा जायेगा...!!'' या ओळींची प्रकर्षाने आठवण होते. यासंबंधी शेख दाऊद भिकनभाई (अध्यक्ष, कब्रस्तान व्यवस्थापन समिती,थेरगाव,ता.पैठण) म्हणाले, "आयुष्याच्या उंबरठयावर अनेक पावसाळे बघीतले. अनेकांच्या अंत्यविधी, दफनविधीस हजेरी लावली. परंतु यंदा सारखा पावसाळा पाहीला नाही. या पंधरवाड्यात आमचे गावांत चार मुस्लिम समाजातील व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी कबरी खोदतांना एक फुटापासूनच पाण्याचे झरे लागले. पाणी बाहेर काढताना शेवटपर्यंत मोठी दमछाक झाली. अन् शेवटी डोळ्यांदेखत कबरीत मृतदेह सोडून ती बंद करेपर्यंत मृतदेह पाण्यात बुडून गेल्याचा दुर्दैवी अनुभव पाहावयास मिळाला. मृतकास जिवंतपणी कधी पाणीटंचाई तर कधी अतिवृष्टीने छळले, अन् शेवटच्या क्षणीही पाण्याने त्यांच्या मौतीची फजिती केली."

गेल्या वर्षी भरपुर पाऊस झाल्यानं शेतीत दमडीचं उत्पन निघालं न्हाय. त्यामूळं यंदा खरिपाच्या पेरणीला पैसे नव्हते. पाऊस वेळवर येईल याची चिंता होती. मात्र तो इकूण तीकून आला...तर तो भलताच पडला..एक हसतो तर एक रडतो अशी अवस्था झाली. शेतकऱ्याला कुणी समजून घेइनात...गेल्या वर्षीचे ओल्या दुस्काळाचं ओझं अजूनही काही सुधारू देईना. उत्पादन खर्च वाढला, उत्पन्न घटलं... अन् आम्ही रडू लागलो. अन् यंदाच्या खरीपासारखं हंगाम तर कधी आज वर पहिला नाही, खरिप पेरलं अन् पावूस पडनं सुरु झालं, तीन महिन्यानंतरही पाऊस सुरूच हाई...पीकं जोमदार येवुनही ती मातीत मिसळले. मागील वर्षापुरता औंदा कधी ऐकण्यात नव्हतं इतका पाऊस आला... या पावसानं आता जाम पोखरलं.... यातुन मेल्या शिवाय सुटका नायं...अन् मेल्यावरही पाणी पिच्छा सोडेना, काय करावे ते सुधरेना...!"

- लक्ष्मण जाधव, शेतकरी,थेरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com