जलवाहिनीला बाधा पोचविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; वॉशिंग सेंटरकडून महापालिकेच्या पाण्याचा वापर झाल्यास नळजोडणी तोडा

जलवाहिनीला बाधा पोचविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा  जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; वॉशिंग सेंटरकडून महापालिकेच्या पाण्याचा वापर झाल्यास नळजोडणी तोडा
Published on: 
जलवाहिनी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; वॉशिंग सेंटरच्या नळजोडणी तोडणार --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २२ : प्रत्येक नळाला तोटी बसवून घेण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेने आवाहन केले आहे. त्यानुसार तोटी न बसविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु करा. तसेच महानगरपालिका जलवाहिनीला बाधा पोचविणाऱ्या किंवा त्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. शहरातील वॉशिंग सेंटरकडून वाहन धुण्यासाठी महापालिकेच्या पाण्याचा वापर होत असल्यास त्यांच्या नळजोडणी तातडीने तोडा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेले वेळापत्रक आणि पाण्याच्या वापराबाबतच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी गुरुवारी आढावा घेतला. या बैठकीला महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, अविनाश कोरडे, महापालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, तहसीलदार वर्षा मनाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह जलसंपदा विभाग, महावितरणचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. धाराशिव, बीड जिल्ह्यातील अधिकारीही या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन डॉ. बास्टेवाड म्हणाले, लातूर महापालिकेने प्रत्येक नळाला तोटी बसवून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे तोटी बसवून नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी जपून वापरावे. वॉशिंग सेंटरमध्ये पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी द्याव्यात. यावेळी राहुल कुलकर्णी यांनी शहरातील पाणी वितरणाचे नियोजन आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. करमरकर यांनीही पाणी पुरवठा अनुषंगाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com