esakal | घाटी रुग्णालयासह परिसरात पावसाचे तळे, पाण्यात ॲम्ब्युलन्स | Ghati Hospital Of Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - घाटी रुग्णालयासह परिसराला पावसामुळे तळ्या रुप आले आहे.

घाटी रुग्णालयासह परिसरात पावसाचे तळे, पाण्यात ॲम्ब्युलन्स

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : घाटी रुग्णालय (Ghati Hospital) आणि परिसरात शनिवारी (ता.दोन) पहाटे झालेल्या धुवाँधार पावसात पाणीच-पाणी साचले होते. डिन बांगला, ॲम्ब्युलन्स पार्किंग परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्या बाहेर कशा काढाव्यात, अत्यावश्यक रुग्णांना कशी सेवा पुरवावी अशी पंचायत ॲम्ब्युलन्स चालकांची झाली होती. गुडघ्या इतक्या पाण्यातून जाऊन चालकांनी त्या बाहेर काढल्या. याच (Rain) ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यालयही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घाटी प्रशासन साफसफाई स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. नर्सिंग हाॅस्टेल, सर्जरी बिल्डिंग, डिन बंगला परिसर अक्षरशः घाणीने वेढलेला आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी घाण पसरलेली असल्यामुळे (Aurangabad) या परिसरात उंदीर, घुशी आणि सापांचा वावर वाढला आहे.

हेही वाचा: ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुरात अडकलेल्या आईसह बाळ वाचले

जीवनदायी योजनेच्या कार्यालयात परिसरामध्ये पाणीच पाणी साचले असल्यामुळे कार्यालयात कसे पोहोचावे असा प्रश्न सर्वसामान्य रुग्णांना पडला आहे. रुग्णांना विविध आजार आणि शस्त्रक्रियांसाठी जीवनदायी योजनेच्या कार्यालयातून मान्यता मिळाल्यानंतरच पुढील उपचार होतात. मात्र या परिसरात तळे साचले असल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत त्रास सहन करावा लागला. अनेक रुग्णांचे नातेवाईक ताटकळलेल्या होते. शनिवारी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असला, तरीही घाटी प्रशासन परिसरातील साफसफाई स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. या परिसरातील वाढलेले गाजर गवत आणि स्वच्छता ठेवली नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे रुग्णांचे व नातेवाईकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top