
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून, एन-१ परिसरातील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आठ महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिन्या टाकल्या आहेत. काही ठिकाणी खोदलेले खड्डे तसेच असल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.