
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेला जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प ९० टक्के भरल्यामुळे गुरुवारी (ता. ३१) १८ वक्राकार दरवाजे प्रत्येकी अर्धा फुटाने उचलून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.