Water Supply close
छत्रपती संभाजीनगर - शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य २,५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोडणी घेण्यासाठी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन १२ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. पाणीपुरवठा पुन्हा आठव्या-नवव्या दिवसांवर गेला.