

Chhatarpati Sambhajinagar
esakal
गंगापूर: उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशी गंगापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी शिवना नदीकाठच्या गावांना आणि लासूर स्टेशन परिसराला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सध्या तालुक्यातील २२ गावांची तहान २६ टँकरद्वारे भागवली जात आहे. मागील वर्षी याच काळात तालुक्यात ६५ टँकर सुरू होते.