तापमान वाढतेय...दुपारी टाळा कष्टाचे काम

येणाऱ्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
weather update aurangabad temperature rising Avoid hard work afternoon
weather update aurangabad temperature rising Avoid hard work afternoon e sakal
Updated on

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. येणाऱ्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताने मृत्यू टाळण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करण्याचे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी करावी, उष्णता शोषून घेणार कपडे (काळ्या किंवा रंगाचे कपडे वापरु नये) सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे.

उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणे याचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे थकवा येणे, ताप येणे, व त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढ, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था अशी आहेत. उपचारासाठी रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कूलर ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णाला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात व आईस पॅक लावावेत. याबरोबरच सलाईन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com