Where is the water?
sakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू केला आहे. स्वतःसह पक्षाने केलेल्या कामांची माहिती देणारी पत्रके मतदारांना देऊन प्रभावित करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू असताना पाणीटंचाईने त्रस्त असलेले मतदार मात्र ‘कुठेय पाणी?’ असा थेट प्रश्न विचारून उमेदवारांना कोंडीत पकडत आहेत. त्यावर काही वेळ बोलती बंद झालेले सर्वच पक्षांचे उमेदवार पुन्हा एकदा मुबलक पाण्यासाठी नवी डेडलाइन मतदारांना देऊन दारातूनच काढता पाय घेत आहेत!