Black Magic : जादूटोण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद; सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये घरासमोर पांढरी मोहरी टाकून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत या घटनेचा दाखला मिळाल्यानंतर गजानन शेकोकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : घरासमोर पांढरी मोहरी टाकून जादूटोणा करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.