esakal | पतीच्या विरहातून मानसिकरित्या खचलेल्या पत्नीने संपविले जीवन
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा

पतीच्या विरहातून मानसिकरित्या खचलेल्या पत्नीने संपविले जीवन

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोनामुळे (Corona) पतीचे निधन झाल्यामुळे मानसिकरित्या (Mental Illness) खचलेल्या महिलेने बुधवारी (ता.२८) दुपारी गळफास घेतला. ही घटना बीड बायपासवरील सुमित्रा पॅराडाईज येथे घडली. रुपाली किशोर देशमुख (३४) असे मृत महिलेचे नाव आहे. रुपाली यांचे पती इंदूरला नोकरीला होते. मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे किशोर देशमुख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या (Aurangabad) मृत्यूनंतर रुपाली या चार वर्षांच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहत होत्या. पण किशोर यांच्या विरहामुळे त्या पुरत्या खचल्या होत्या. बुधवारी दुपारी त्यांचे आई-वडिल घराबाहेर गेले होते. त्यानंतर रुपाली यांनी मुख्य दरवाजाला आतून कडी लावून घेत आतील खोलीत पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.(wife committed suicide in aurangabad glp88)

हेही वाचा: पोलिसांच्या बदल्यांचा फुटला पोळा, मर्जीतल्यांची मात्र चांदी

घरी परतलेल्या आई-वडिलांनी बऱ्याचदा आवाज दिल्यानंतरही रुपाली या दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांनी शेजाऱ्यांना बोलावत दरवाजा तोडला. त्यातून आत गेल्यावर आतील खोलीत डोकावले. तेव्हा रुपाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर शेजारी प्रथमेश महाजन आणि ऋषीकेश देशमुख यांनी रुपाली यांना बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई-वडिल आणि चार वर्षांची मुलगी आहे. तसेच त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.

loading image
go to top