Wife Victims Pimpal Pournima protest
esakal
बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर) : वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमातर्फे आज ‘पिंपळ पौर्णिमा’ हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात (Pimpal Pournima symbolic protest) आला. पिंपळाच्या झाडाला १०८ उलट्या प्रदक्षिणा घालत आम्हाला ‘सात जन्म काय, एक क्षणदेखील ही पत्नी पुन्हा नको’, अशी प्रार्थना यावेळी पत्नी पीडितांनी केली. तसेच, महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याचीही मागणी केली.