
औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Will renaming of Aurangabad be announced Sanjay Raut made it clear)
हेही वाचा: रावसाहेब दानवेंचे पुत्र मविआला मतदान करणार; सत्तार यांचा दावा
संजय राऊत म्हणाले, "औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा पूर्णपणे सरकारी विषय आहे. त्यामुळं त्यावर मी आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही. पण महाराष्ट्र सरकारच्यावतीनं संभाजीनगर अधिकृतपणे व्हावं, शासकीय गॅझेटमध्ये व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडं गेलेला आहे. त्यामुळं केंद्रानं जशी देशातील इतर शहरांची नामांतर तात्काळ केली त्याचप्रमाण हे देखील करावं"
हेही वाचा: ...तर राज्यसभेसाठी एमआयएम तटस्थ राहणार
उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. दोन वर्षानंतर मुंबई बाहेर त्यांची पहिलीच सभा आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही काळात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते कोणालाही निराश करत नाहीत. नक्कीच आज त्यांचं भाषण हे एक मैलाचा दगड ठरेल असं वाटतं, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
देसाई, रावतेंनी तरुणांना संधीसाठी माघार
सुभाष देसाई, दिवाकर रावते हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी तरुणांना संधी मिळावी म्हणून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही नेत्यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य पणाला लावलं आहे. यामध्ये मराठीचा, हिंदुत्वाचा लढा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही साथ दिली.
Web Title: Will Renaming Of Aurangabad Be Announced Sanjay Raut Made It Clear
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..