पिंपळदरीत दिवसाढवळ्या लांडग्याची दहशत

पिंपळदरीत दिवसाढवळ्या लांडग्याची दहशत
Published on
गोठ्यासमोरून शेळीचे पिल्लू उचलून नेले; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण अजिंठा ता . २२ (बातमीदार ) जंगलालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असला तरी दिवसाढवळ्या गोठ्याच्या दारापर्यंत येऊन लांडग्याने शेळीचे पिल्लू उचलून नेल्याने पिंपळदरी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुभाष सोनाजी शिरसाट यांच्या शेतातील गट क्रमांक १४ मध्ये मंगळवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास शेळीची पिल्ले गोठ्यासमोर पाला चारत होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या लांडग्याने अचानक एका पिल्लावर झडप घातली. काही क्षणांतच पिल्लाला तोंडात पकडून लांडगा तेथून पसार झाला. हा प्रकार शेतकऱ्यांच्या नजरेसमोर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. रात्रीची भीती आता दिवसाही आतापर्यंत रात्रीच्या वेळी जनावरांच्या सुरक्षेची चिंता असलेल्या पशुपालकांना आता दिवसाही सावध राहावे लागत आहे. शेळ्या-मेंढ्या तसेच वासरे चारताना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात लांडग्याचा परिसरात वावर कायम राहिल्यास भविष्यात मोठ्या पशुधनालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पशुपालकांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून लांडग्याच्या हालचालींचा माग काढावा, परिसरात गस्त वाढवावी आणि पशुधनाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दिवसा माणसांची उपस्थिती असतानाही गोठ्याजवळ येऊन लांडग्याने केलेल्या हल्ल्यामुळे वनविभागासमोर पशुधनाच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com