
fraud
छत्रपती संभाजीनगर - पहिला विवाह झालेला असताना दुसरा विवाह करून कर्नाटक येथील महिलेने शहरातील एका पुरुषाला फसवल्याचा प्रकार समोर आला. लग्न मोडण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी रवी वासुदेव वाधवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंगळुरू येथील रंजीता पीतांबर छाबरिया (वय-४७), संजय माखिजा (रा. सिकंदराबाद) यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ८) गुन्ह्याची नोंद झाली.