
Daulatabad News
sakal
दौलताबाद : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात पत्नीने थेट दौलताबाद पोलिस ठाण्यासमोरच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १६) गंगापूर तालुक्यातील जांभळा येथे घडली. तर संशयित प्रेयसीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.