esakal | औरंगाबादमध्ये शेतीच्या वादावरून महिलेला मारहाण; मारहाणीत महिलेचा गर्भपात

बोलून बातमी शोधा

Daulatabad
औरंगाबादमध्ये शेतीच्या वादावरून महिलेला मारहाण; मारहाणीत महिलेचा गर्भपात
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: शेतीच्या वादातून जटवाड्यात महिलेला जबर मारहाण करण्यात आलेली आहे. या मारहाणीमूळे महिलेचा गर्भपात झाल्याचे महिलेच्या पतीने आरोप केला आहे. मारहाणीनंतर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. तर महिलेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून काही आरोपीनांही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दौलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दोन्ही गटातील वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्यानंतर महिलेलाही जबर मारहाण केल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीचे अजून नऊ प्रकल्प उभारणार

दुर्देवाने या मारहाणीत महिलेचा गर्भपात झाल्याचाही आरोप केला आहे. यासंबंधी दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.